कर्तृत्वाची वाट उजळवत यशाच्या नव्या शिखराकडे… मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणीतून जनसेवेचा ध्यास… संघटनात्मक कार्यातून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत झेप; मेघराज हट्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम!

कोल्हापूर : पत्रकारिता ही केवळ बातमी मांडण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे प्रभावी साधन आहे. या विचाराला आपल्या कार्यातून मूर्त रूप देणारे युवा पत्रकार संघ, कोल्हापूरचे

प्रदेश उपाध्यक्ष मेघराज रामाप्पा हट्टी

हे पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.

काही वर्षांपूर्वी युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी संघटनेत सहभाग नोंदविला. मात्र, केवळ पदासाठी नव्हे तर कार्याला प्राधान्य देत अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सदस्य म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास तालुका अध्यक्षपदापासून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचला. ही झेप त्यांच्या संघटन कौशल्याची, सातत्यपूर्ण कामाची आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीची पावती आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील  मुत्तनाळ गावचा सुपुत्र असलेले मेघराज हट्टी यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून मर्यादित नाही. उत्कृष्ट निवेदक, मनमिळावू व प्रेमळ स्वभाव आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची हातोटी यामुळे त्यांनी आपला मोठा मित्रपरिवार निर्माण केला आहे.

गावपातळीवर एखादी विकासकामाची समस्या निर्माण झाली, मग ती गावांमध्ये गल्लीतील रस्त्याची असो, स्वच्छतेची असो अथवा कचरा व्यवस्थापनाची, सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या संबंधित लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे काम मेघराज हट्टी सातत्याने करतात. अन्याय किंवा समस्या दिसली की त्यावर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे आवाज उठविण्याची त्यांची भूमिका समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य या तिन्ही आघाड्यांवर प्रामाणिकपणे वाटचाल करणारा हा युवा पत्रकार संघाचे “आयडॉल” गावच्या बांधापासून राज्याच्या पातळीपर्यंत सर्वांना आपलेसे करणारा ठरला आहे. पद मोठे झाले म्हणून माणूस मोठा होत नाही; तर माणुसकी, कार्यकर्तृत्व आणि समाजासाठी असलेली तळमळ माणसाला मोठे बनवते—याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेघराज हट्टी.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा प्रवास आणखी उंच भरारी घेणारा ठरो, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचित, सामान्य आणि गरजू घटकांचा आवाज अधिक बुलंद व्हावा आणि संघटनात्मक कार्यातून युवा पत्रकारांना नवी दिशा देण्याचे बळ त्यांना लाभावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक, मनःपूर्वक आणि लक्षवेधी शुभेच्छा!

संस्थापक अध्यक्ष शिवाजी तुकाराम शिंगे
व युवा पत्रकार संघ, कोल्हापूरच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *