‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोल्हापूर : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या समर्पित आणि अविरत जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आणि संपूर्ण महाडिक परिवाराच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.
यावेळी महाडिक परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दीर्घ आणि निरंतर जनसेवेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
‘आशीर्वादाचा दिवा’ हा कृतज्ञता, सेवा आणि संकल्पाचे प्रतीक म्हणून प्रज्वलित करण्यात आला. या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी कार्याप्रती महाडिक परिवाराने आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.


