गुणवंत शिक्षकांचा कोल्हापुरात गौरव; ‘EMSA INSPIRE 2026’ सोहळा २४ सप्टेंबरला

कोल्हापूर, दि. २१ : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) यांच्या वतीने ‘EMSA INSPIRE 2026’ राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे हा सोहळा होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

१११खासदार धनंजय महाडिक यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांची निर्धारित निकषांनुसार पारदर्शक छाननी व मूल्यांकन करून गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोपक्रम आणि समर्पणाला प्रोत्साहन देणे, हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे EMSAचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *