तीन लाखांच्या दहीहंडीचा थरार! कोल्हापुरात गोविंदांची ‘गोविंदा’ गर्जना

दसरा चौक सज्ज; युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला — खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून तयारीची पाहणी

कोल्हापूर : थरावर थर रचत आकाशाला गवसणी घालणाऱ्या गोविंदांच्या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक सज्ज झाला आहे. भाजप व धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य युवाशक्ती दहीहंडी सोहळा रंगणार असून, तब्बल ३ लाख रुपयांच्या मुख्य बक्षिसासाठी पश्चिम महाराष्ट्रातील गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी दसरा चौक मैदानात जाऊन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. सुमारे ४५ फूट उंचीवर दहीहंडी बांधण्यात येणार असून, गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि भव्य प्रकाशयोजनाही करण्यात आली आहे.

साहसी खेळाला प्रोत्साहन देतानाच गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य”, अशी भूमिका खासदार महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली.

या सोहळ्याला राज्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार असून, सलामीपासून विविध भरघोस बक्षिसांची लयलूट होणार आहे. त्यामुळे तीन लाखांची युवाशक्ती दहीहंडी कोण फोडणार? याकडे संपूर्ण कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी तयारीची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *