विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी
कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जीत केलेल्या गणेशमुर्ती महापालिकेकडून इराणी खण येथे विसर्जीत करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची पाहणी पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ अभिनव देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत केली.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश विसर्जन हे सुव्यवस्थित व्हावे यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी सूचना केली.
यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव हा गर्दी टाळून प्रशासनाचे नियम पळून साजरा करावा, असं आवाहन शासनाने केले आहे. तर कोल्हापूर महापालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरगुती गणेश विसर्जन हे विसर्जन कुंडात करावे असे आवाहन केले होते. त्यानंतर विसर्जित केलेली मुर्त्या महापालिकेमार्फत पुन्हा इराणी खण येथे विसर्जित करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यानुसार इराणी खण येथे हि व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ अभिनव देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमवेत इराणी खण येथील विसर्जन स्थळाची पाहणी केली.
पालकमंत्री ना.सतेज पाटील यांनी विसर्जन हे लवकरात लवकर व्हावे, यासाठी नेटके नियोजन करण्याच्या सूचना केल्या. घरगुती गणेश मुर्ती कृत्रिम कुंडात विसर्जनानंतर महापालिकेकडून या मुर्त्या इराणी खण येथे विसर्जीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे याठिकाणी हायमास्टची संख्या वाढवून पुरेशा लाईटची व्यवस्था करावी, कृत्रिम विसर्जन कुंडाजवळील गणेश मुर्ती आणण्याठी ट्रॅकरची संख्या वाढवावी, खणी मध्ये मूर्ती विसर्जित करण्यासाठी पुरेसे कर्मचारी ठेवावेत. कर्मचारी कमी पडता कामा नयेत. रात्री संकलीत केलेल्या मुर्त्या विसर्जीत करणेस वेळ झाल्यास त्या मुर्त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास भागातील हॉल उपलब्ध करुन ठेवावेत, आशा सूचना प्रशासनाला केल्या.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शहर आणि उपनगरातील नागरिकांनी महापालिका आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.
महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी गणेश मुर्ती विसर्जनावेळी सोशल डिस्टंन्स पाळावे, गर्दी टाळावी, सुरक्षित अंतर ठेवून गणेश मुर्ती विसर्जीत कराव्यात, इराणी खण येथील गर्दी कमी करण्यासाठी नागरीकांनी महापालिकेने प्रभागाअंतर्गत विविध ठिकाणी ठेवलेल्या विसर्जन कुंडातच गणेश मुर्ती विसर्जीत करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे इराणी खण इथे गणेश विसर्जनाचे योग्य नियोजन करण्यात येत असून विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आरती घरीच करून कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी मूर्ती आणून विसर्जीत करावी.
कृत्रिम विसर्जीत कुंडाच्या ठिकाणाहून मुर्ती आणनेसाठी अजून ट्रॅक्टरची आवश्यकता असून ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांनी यासाठी सहायक अभियंता यांत्रिकी चेतन शिंदे (८४११८२७१२९) यांच्याशी संपर्क साधावा. यासाठी महापालिका प्रत्येक ट्रॅक्टरसाठी डिजेलसह ३०००/- रुपये देईल. असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, माजी नगरसेवक मधूकर रामाणे, कनिष्ठ अभियंता सुनिल भाईक, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, आश्पाक आजरेकर, दिग्वीजय मगदूम, किरण पाटील आदी उपस्थित होते.