प्रतिनिधी :अतुल पाटील
कोल्हापूर दि.27: कृषि महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषि
जागरुकता व कृषि औध्योगिक कार्यांनुभव कार्यक्रम या अंतर्गत वाशी येथे कृषिदूतामार्फत शेतकऱ्यासाठी विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या सत्रात कलम बांधणी,जीवामृत व सेंद्रिय कीटकनाशक निमिर्ती कीड व रोग व्यवस्थापन.
माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर हुमणी कीड व्यवस्थापन बीज प्रक्रिया गांडूळखत
निर्मिती नवीन पिकाची लागवड कमी खर्चात कीटक सापळ्याची निर्मीती अशा अनेक विषयांवर 5 सप्टेंबर पर्यंत सागवंडे वाशी येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण निशुल्क असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
येत्या महिन्यात शेतकऱ्यांसाठी आठवडाभर पीक चिकित्सालय निर्माण करण्यात येणार आहे.
यावेळी कुषीदूत अभिषेक पाटील, ओंकार पाटील, अंबरीश भास्कर, साईराज वाघवेकर, ओंकार खोत, उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियमन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. कुमार गुरव कार्यक्रम समन्वयक व मार्गदर्शक बी. टी . कोलगणे अधिकारी,
प्रा. एस. ए. सरवदे, सी. यू. जी शिंदे
ए. बी. जाधव आर. शिंदे करत आहेत