सांगली प्रतिनिधी: शरद गाडे
महानगरपालिका क्षेत्रात प्राइवेट कोव्हीड सेंटर मध्ये कोरोना ग्रस्त रूग्णांची लूट हेडसळ होत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात येत असणाऱ्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करून,तात्काळ शासनाच्या खर्चाने ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड तसेच सर्व सोईनियुक्त कोरोना उपचार केंद्र उभा करा. अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाची मागणी.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात प्राइवेट कोव्हीड सेंटर मध्ये कोरोना ग्रस्त रूग्णांची खुलेआम लूट व हेडसळ होत आहे.त्यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या प्राइवेट कोव्हीड सेंटर हॉस्पिटलची मान्यता रद्द करून,तात्काळ शासनाच्या खर्चाने ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असणारे तसेच सर्व सोई सुविधा एका ठिकाणी उपलब्ध असणारे कोरोना उपचार केंद्र करण्यात यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी सांगली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकात असे म्हटलेले आहे की,संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमाल घातलेला आहे. त्यात आपल्या सांगलीचा नंबर वन आहे.
दिवसेंदिवस कोरोना विषाणू च्या रूग्णाची संख्या वाढतच चालेली आहे.तसेच ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड ची कमतरता भासत आहे.परिणामी रूग्णाचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. प्रशासनाकडे मनुष्य बळ अपूर्ण पडत असल्यामुळे कोरोना विषाणू चा वाढता धोका टाळावा म्हणून मा.जिल्हाधिकारी आणि मा.आयुक्त यांनी महानगरपालिका क्षेत्रातील काही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट कोरोना सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल रूग्णाकडे सेवा दृष्टीने न पाहता कोरोनाच्या नावा -खाली बाजार सुरू केलेला आहे.
सद्या कोरोना विषाणुजन्य प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे तसेच पेशंटच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन लूट सुरू केली आहे. हॉस्पिटलमध्ये प्रथम दर्शी कोरोना पॉझीटिव्ह असणारा पेशंट आल्यास त्या पेशंटला कॉट(बेड) शिल्लक नसल्याचे कळवले जाते नंतर पेशंट च्या नातेवाईकांनी जास्त गयावया केल्यास त्यांना दिड लाख रूपये डिपाजीट भरावयास सांगितले जाते, तसेच कॉटवर ताबडतोब तीस हजार रूपये भरून घेतले जाते,आणि ह्या पुढे येणारा खर्च वेगळा असेल असे सूनावले जात आहे.आपल्या सांगली जिल्हा तसेच शहरात मोठ्या प्रमाणात श्रमिक कष्टकरी मोल- मजूर कामगार वर्ग राहत असून त्याला हॉस्पिटल च्या मोठ्या रक्कमा न पेलवणाऱ्या आहेत.कोरोना चा महामारीने त्यांना एक वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे.ते आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवत आहे. अशा परिस्थितीत एवढा मोठी रक्कम कोठून आणणार, अशा बिकट परिस्थितीमध्ये गोरगरिब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांची प्रायव्हेट कोरोना सेंटर हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात फसवणूक , लूट करीत आहेत, सर्वसामान्य जनता होरपाळली जात आहे.
सद्या “आंधळ पिट दळतो आणि कुत्र पिट खात” अशी महणी प्रमाणे गत निर्माण झालेली आहे.प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खुलेआम पेशंटची आर्थिक लूट सुरू असल्याने नागरिकांनी तक्रार करून ही कोणत्याही हॉस्पिटलच्या वरती कारवाई न झाल्याने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे सगळं चालू असावे, अशी सर्वसामान्यच्या मध्ये भावना निर्माण होत आहे. त्यांमुळे आपण परवानगी दिलेल्या प्राइवेट हॉस्पिटलमधील कोव्हीड सेंटरची परवानगी रद्द करून सदरचे हॉस्पिटल बंद करावेत,तसेच गोरगरिब कष्टकरी मोलमजूर कामगार वर्ग तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना चांगल्या दर्जाचे सर्वसोईनियुक्त शासकीय खर्चातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड तयार असलेले राज्यशासनाच्या मदतीने कोविड केंद्र उभा करून मोफत उपचार उपलब्ध करून देऊन सर्व गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गातील तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या शुभेच्छा घ्यावेत.
अशी मागणी ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ.महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांच्या मार्फत,जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी केली आहे. मा.राज्यपाल,मा.मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनाही ईमेल द्वारे कळवण्यात आले आहे.
त्यावेळी,अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे(दिपंकर),वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष मनोहर कांबळे सर,यांच्या सहीत संघटनेचे सदस्य युवराज कांबळे,राहुल कांबळे, महावीर गिरगावकर,विक्रांत सादरे,सुनिल जमने,सर्जेराव सावंत,विक्रांत गायकवाड,सुहास कांबळे,सहदेव कांबळे, यांच्या बरोबर बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________