विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण रुग्णालये बळकट होण्याची नितांत गरज असून राज्य शासनाचा तसा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील बारा रुग्णालये अत्याधुनिक व समृद्ध करण्याचा प्रयत्न खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे, संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल, असे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा शिवसेना पुरस्कृत सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान व सदाशिवराव मंडलिक फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील दहा ग्रामीण रुग्णालय व दोन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज अतिदक्षता कक्षांच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यात श्री ठाकरे बोलत होते.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी चर्चा करताना कोविडचा कटू अनुभव घेतल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम झाली पाहिजे, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले की , सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा संजय मंडलिक यांनी जपलाच आहे; पण स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यातही ते पुढे सरसावले आहेत. आज त्यांच्यामुळे बारा रुग्णालये अत्याधुनिक व सक्षम होत आहेत, ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरली आहे.
गांधीनगर शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये झालेल्या या सोहळ्यास जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, अवधूत साळोखे, पोपट दांगट, दीपक पाटील, राजू सांगावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ विद्या पॉल, डॉ बिना रुईकर, भगवान कदम, संदीप दळवी, दीपक पोपटांनी, सुनील पारपाणी, दीपक अंकल, किशोर कामरा जितू चावला, भारत खोत, भगवान पंजवानी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.