Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वराज्य जनरल कामगार सेना व मराठा सेवा संघ जिल्हा सहसचिव श्री.संजय धुमाळ यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
कृती समिती संघटना पदाधिकाऱ्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करू नये…
२) विविध योजनांचे अर्ज निकाली काढण्यात यावे…
३) ५००० रू अवजारे खरेदी करण्याची योजना पूर्ववत सुरू करावी…
४) कोरोना कोविड -१९ लॉकडाऊन काळातील जाहीर केलेले निधी त्रुटी दूर करून खात्यावर जमा करण्यात यावी…
या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले .
कृती समिती संघटना पदाधिकाऱ्यांच्या या सर्व मागण्यांची दखल घेऊन नक्की कार्यवाही सुरू करू, असे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
Share Now