कोल्हापूर.दिनेश चोरगे : सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष श्री प्रदीप घाटगे यांनी गेल्या पाच महिन्यात कोरोनाच्या महामारी मध्ये कोरोना योध्या बनून अत्यंत उत्कृष्टपणे लोकसेवेचे कार्य केले बद्धल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार महाराष्ट्र पत्रकार संघ यांचे तर्फे कोल्हापूरचे ज्येष्ठ हौशी क्रीडा प्रेमी श्रीयुक्त बाबा महाडीक, शाहू मेरेथॉन् चे किसान बापू भोसले, जनप्रवासचे जिल्हा व्यवस्थापक श्री श्रेयस भगवान, ज्येष्ठ संपादक श्री भाऊसाहेब तथा काका कदम यांचे हस्ते शाल, श्रीफळ,व झाडाचे रोप देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी गेल्या पाच महिन्यातील जायंटस ने केलेल्या समाज उपयोगी कार्याचा आढावा दै. जनप्रवास चे जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र मकोटे यांनी घेतला.
सत्कार भाषणात श्री प्रदीप घाटगे यांनी देशात व परदेशात जायंटस कसे काम करते व जायंटस च्या कार्याबद्दल माहिती सांगितलीे व थोडक्यात कोल्हापूर मध्ये केलेल्या कार्याचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी दै. जनप्रवासचे जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र मकोटे, ज्येष्ठ संपादक श्री भाऊसाहेब तथा काका कदम, आंतरराष्ट्रीय चेस चे रेफरी श्री भरत चौगले, सावली ब्रिजचे श्री किशोर देशपांडे, श्री जयेश कदम, श्री संजय साळवी, समाजसेविका श्रीमती अनिता काळे, सावली चे फीजिओ डॉक्टर, फुटबॉलपटू प्रणव भोपळे व त्यांचा परिवार व इतर ज्येष्ट पत्रकार व वृतपत्रिकेमधील इतर अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन श्री राजेंद्र मकोटे यांनी केले केले. व शेवटी आभार श्रीमती अनिता काळे यांनी केले.