विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : कोथळी येथील मंगेशनगर विद्यामंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करुन १०७ वृक्षांचे वृक्षारोपण करून मोठ्या दिमाखात समारंभ संपन्न झाला. तसेच पुढील वर्षभरात १००० वृक्षाचे वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट संस्थेने डोळ्यासमोर ठेवले आहे.
यावेळी आरोग्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी मातोश्री सोशल फौंडेशन या संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत संस्थेने लावलेल्या वृक्षाचे वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन संस्थाही त्यांनी लावलेल्या वृक्षाप्रमाणे मोठी होवो, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना आरोग्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष जीवन आवळे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांनी अगदी कमी वयामध्ये केलेल्या कामगिरीचे कौतुक करून त्यांची पाठ थोपटली. तसेच मातोश्री सोशल फौंडेशनचे कार्य सर्वांना प्रेरणादायी व आदर्शवत होईल, अशी अशा व्यक्त केली.
या कार्यक्रमास कोथळीच्या सरपंच सौ. अमृता पाटील, उपसरपंच प्रतिभा कांबळे , गटनेते संजय नांदणे, संस्थेचे उपाध्यक्ष अमोल बरकडे , सचिन सुशांत चुडाप्पा, खजिनदार रमेश घाटके, त्याचबरोबर शीतल पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, सचिन कांबळे, रावसाहेब बोरगावे, सागर पुजारी, रवी पुजारी, यासह ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व संस्थेचे इतर सर्व सदस्य ,जयसिंगपूर कॉलेज , जयसिंगपूर चे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने व स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री स्नेहा पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक अध्यक्ष जीवन आवळे यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी व्यक्त केले.