Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 17 Second
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आज दि. ३ सप्टेंबर रोजी मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना आज निवेदन देण्यात आले .
सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा अलीकडे सांगली जिल्ह्यात ही भयानक उद्रेक झाला आहे .
सामान्य रुग्णांना बेड मिळत नाहीत आणि बेड मिळाला तरी त्यासाठी लागणारा खर्च सामान्य लोकांना करण्यास अडचण झाली आहे . या सगळ्यांची भावना लक्षात घेता मा आयुक्तांना मिरज मध्ये १०० बेड चे कोविड हॉस्पिटल चालू करावे , अशी विनंती करण्यात आली.
यावेळी संदीप आवटी (सभापती. स्थायी समिती ) नगरसेवक निरंजन आवटी , बाबासाहेब आळतेकर , दिगंबर जाधव, संदीप सलगर ,सुमेध ठाणेदार, सुनील मोतुगडे, नितीन आवटी ,महेश पाटील,शमाकांत आवटी , विशाल सागरे, वसीम पठाण उपस्थित होते.