ना नफा ना तोटा रूग्णांसाठी बेड उपलब्ध..

प्रतिनिधी : इरफान शेख

मोठ-मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लकविशेष नाहीत, कोरोना नसलेले परंतु इतर आजाराने देखील लोक योग्य वेळी व योग्य औषध उपचार मिळत नसल्याने मृत्युमुखी पडत आहेत,

Advertisements

कोरोना टेस्ट दर गोरगरीबांना परवडत नाही, बेड मिळत नाही म्हणुन लोक धास्तावले आहेत, आपले इतर आजार लोक अंगावर काढत आहेत, ही खंत आष्टा सारख्या ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे,

आष्टा येथील केदार हॉस्पिटलचे डॉ. पंडित आवटी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि..लोकांना योग्य वेळी उपचार घेतल्यास व मानसिक आधार दिल्यास कोरोना सारख्या परिस्थितीवर आपण नक्की मात करू शकतो जास्तीत जास्त लोक बेडसाठी आग्रह करत आहेत महागडे बेड घेणे त्वरित शक्य नाही,

परंतु परिस्थिती चे गांभीर्य ओळखून शक्य तितक्या लोकांना योग्य तो प्राथमिक उपचार मिळावा हा मुख्य प्रामाणिक हेतू असून खाजगी कारखानातून नवीन कॉट बेड रुग्णांसाठी  उपलब्ध  करत आहे.

डॉ. आवटी त्यांनी स्थानिक कॉट बेड कारखान्यास भेट देऊन १० नवीन बेडची ऑर्डर दिली.
मोहम्मद दस्तगीर शेख यांचे रामनगर येथील कारखाना गेल्या ६ महिन्यापासून परगावचे कारागीर असल्याने बंदच आहे.

डॉक्टरांच्या मागणीनुसार रुग्णांच्या सोईस्तव स्थानिक कारागिरांना घेऊन ना नफा, ना तोटा कमीत कमी दरामध्ये नवीन बेड ची व्यवस्था करून दिल्याबद्दल डॉक्टररानी शेख यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *