उद्योगपती सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग व महिला कर्मचारी यांना अर्थसहाय्य

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 57 Second

विशेष प्रतिनिधी : शरद गाडे

सांगली : कोविड – १९ मुळे सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे उद्योग-व्यवसाय व कामगार वर्गाला खूप अडचणीला सामोरे जावे लागले.

 व्यवसायिकांना इच्छा असून देखील आपल्या कामगारांना मदत करत असताना मर्यादा येऊ लागली. काही समाजसेवक यांनी पुढाकार घेऊन गरीब, कामगार, मजूर व छोट्या व्यवसायिकांंना विविध स्वरूपात मदत केली. त्यात सी.आर. एस. ग्रुप (CRS group ) चे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती मा. सी. आर सांगलीकर यांनी देखील गरीब, कामगार, मजूर व छोट्या व्यवसायीकांंना अन्नधान्य, भाजीपाला, मास्क अशा विविध स्वरूपात मदत केली. परंतु महिना दोन महिने मदत करून देखील या वर्गाच्या अडचणी संपत नव्हत्या. आर्थिक उलाढाल थांबलेली होती त्यामुळे त्यांना उभारणीसाठी आर्थिक साहाय्यतेची गरज होती.
 बँकाही या स्थितीत त्यांना कर्ज वाटप करत नव्हती. म्हणून सी. आर. एस. ग्रुप चे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती सी. आर सांगलीकर यांच्या मार्गदर्शना खाली सुरू असलेली अथर्व मल्टीपल अर्बन इंडिया निधी लि. च्या माध्यमातून अशा वर्गाना कर्ज वाटपाचा निर्णय घेतला.
या संस्थेच्या शाखा क्रमांक ३, याची सुरवात ३ ऑगस्ट २०२० रोजी सतारमेकर गल्ली, मिरज येथून झाली. याचाच भाग म्हणून अथर्व गारमेंट इंडिया प्रा. लि. च्या महिलां कर्मचारी यांना कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी सी.आर. एस. ग्रुपचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती सी. आर सांगलीकर, संगाप्पा पाटोळे, सौरभ पाटील, बँकेच्या चेअरमन तृप्ती घोलप, संचालक दिपक कांबळे, डॉ. बसवराज पाटील, प्रदिप कांबळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
 अशा प्रकारच्या कर्जाचे वाटप महिला बचतगट, कामगार, मजूर व छोटे व्यवसायीक यांना करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सरकारने देखील या वर्गातील लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे अवाहन सी.आर. सांगलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *