गारगोटी प्रतिनिधी राजेंद्र यादव : सामाजिक कार्यात नेहमीच आग्रेसर असलेल्या उमेद फौंडेशनच्या वतीने धामणी खोऱ्यातून २० हजार शेणी जमा करून कोल्हापूर म.न.पा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पंचगंगा स्मशान भुमीस सुफुर्द करण्यात आल्या.
कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभुमी येथे कोरोना रूग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालत असल्याने अंत्यसंस्काराकरिता शेणींचा तुटवडा जाणवत आहे.याकरिता प्रशासनाकडून शेणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याच अनुषंगाने उमेद फौंडेशनच्या वतीने धामणी खोऱ्यातील गावामध्ये मदतीचे आवाहन करत शेणी संकलित करण्यात आल्या .
या मध्ये १ सप्टेंबर रोजी पणोरे (धडपड फौंडेशन ) भित्तमवाडी,जोगमवाडी,सावतवाडी,म्हासुर्ली , पाटीलवाडी येथील ग्रामस्थांच्या प्रतिसाद मिळत १० हजार शेणी तसेच ३१ ऑगस्ट रोजी कोदवडे, गोगवे, आंबर्डे, वेतवडे, हरपवडे, पात्रेवाडी या गावातून १० हजार अशा एकुण २० हजार शेणी गोळा करून धामणी खोऱ्यातून पंचगंगा स्मशानभुमीस देण्यात आल्या .
या सामाजिक उपक्रमा साठी राजाराम पात्रे , विलास पाटील ,प्रकाश गाताडे, विजय पाटील, तसेच धडपड फौंडेशन पणोरे यांचे सहकार्य लाभले.