मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
संभाजी ब्रिगेड संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शिवश्री मा रुपेश पाटील यांची नूतन जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड.
संभाजी ब्रिगेड संघटनेचा गेल्या अकरा वर्षापासून मी परिचित आहे.
प्रदेशाध्यक्ष शिवश्री मा. मनोज साखरे व राज्य उपाध्यक्ष सन्मानीय शिवश्री मा हिंदुराव हुजरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जय जिजाऊ बिद्र वाक्य घेऊन पदाधिकारी व सभासद, कार्यकर्ते यांच्या उन्नती व विस्तारासाठी संघटनेचे काम शिस्तबद्ध पद्धतीने क्रियाशील काम चालू आहे. हिंदुराव हुजरे पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष असताना. कोल्हापूर जिल्ह्यात सर्व सामान्याच्या न्याय हक्कासाठी भरीव काम करून पश्चिम महाराष्ट्रमध्ये संघटनेचे,
मुळ मजबूत व भक्कम केले आहे.
त्यांनी संभाजी ब्रिगेड चे सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतांना. एक किस्सा आठवणी साठी जरूर सांगावस वाटत ज्येष्ठ व तज्ञ व्यक्ती भेट झाली की. सांगत असत
संभाजी नाव हे सर्वांच्या परिचयाचा आहे. पण ब्रिगेड हेच जोड नाव संघटनेने का निवडल व कुठल्या राज्यातून कुठून कसं घेतलं याचे महत्व पटवून देत.
त्यांनी संघटनेचे काम उत्साही आत्मविश्वासाच्या जोरावर वाडी-वस्ती गाव शहर जिल्हा पर्यंत नाव लोकिक केल. 2011 साली युवा पत्रकार संघाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमा मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे
जिल्हा पोलीस प्रमुख मा. विजयसिंह जाधव यांनी
सन्माननीय शिवश्री मा हिंदुराव हुजरे पाटील यांचे
त्यांच्या कार्याबद्दल गौरव पूर्वक विशेष सत्कार केला होता.
तद नंन्तर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब पाटील पुरोग्रामी विचाराचे मेळावे व व्याख्यान घेऊन समाज जागृत करून जिल्ह्यामध्ये संघटना बांधणी मध्ये त्यांचाही मोठे योगदान आहे.
तर त्याच जोमाने जिल्हाध्यक्ष शिवश्री मा रुपेश पाटील यांचे कार्य क्रियाशील धाडशी कौतुकास्पद आहे. म्हणूनच नेहमी चांगल्या कामाची चांगली बक्षीस मिळतो संभाजी ब्रिगेड संघटनेने पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी मा. रुपेश पाटील यांची फेर निवड करून चांगले काम करणार्या कार्यकर्त्यांच्या आम्ही नेहमी दखल घेत सन्मान करतो असे दाखवून दिले आहे.
नूतन जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील यांनी सांगताना संभाजी ब्रिगेड संघटनेने माझ्यावरचा दाखवलेला विश्वास व जिल्हाध्यक्षपदी दिलेली जबाबदारी हे सन्मान हे जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे या पुढे ही उत्साहाने डबल ताकतीने आपल्या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या साथीने जोमाने काम करणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्व स्तरातून नूतन पदाधीकार्याचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.