विशेष प्रतिनिधी :शरद गाडे
सांगली : कोरोनाच्या महामारी ने आज थैमान घातले आहे लोकांच्या मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाधित लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचार करताना भरमसाठ खर्च येत आहे. सर्वसामान्य गरीब लोकांना महागडा उपचार करता येणे शक्य नाही. म्हणून उपचाराअभावी लोकांचे हाल होत आहेत त्यातूनच मोठ्या प्रमाणात मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
सध्या कोरोना बाधित रुग्णांना जे औषध उपचार केले जातात त्यामध्ये (रेमडिसीव्हर10 mg / 20 mg) हे इंजेक्शन पैसे घेऊन दिले जाते मात्र आपल्या शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे इंजेक्शन पूर्णपणे मोफत दिली जाते. त्यासाठी रुग्णांचे आधार कार्ड ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तेथील डॉक्टरांचे मागणी पत्र रुग्णांची कोरोना बाधित असलेले रिपोर्ट ची झेरॉक्स प्रत घेतली जाते. याची शहानिशा करून रेमडिसीव्हर हे इंजेक्शन पूर्णपणे मोफत दिली जाते. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात रेमडिसीव्हर हे इंजेक्शन मोफत मिळावे , जेणेकरून सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधार मिळेल व त्यांच्यावर पडणारा आर्थिक बोजा कमी होईल कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात ही सुविधा पुरवण्यात यावी , अशी विनंती मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांनी मा. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना केली आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आनंद लेगंरे ,शितल लोंढे, बाळासाहेब निकम, मयूर बांगर, अवधूत गवळी, शंकर जामदार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.