Share Now
विशेष प्रतिनिधी : नजीर शेख
मिरज : मुंबईतील शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान तसेच असंख्य शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या हस्तकाने फोन करून बाँबने उडवून देण्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रभर दिसत आहेत.
त्यातच आज मिरजेतील महाराणा प्रताप चौक मार्केट परिसरात शिवसेना मिरज शहर प्रमुख विशाल राजपूत यांनी शिवसैनिकांसोबत आंदोलन केले.
कुत्र्याच्या गळ्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा फोटो बांधून धिंड काढत ,जगाच्या पाठीवर मातोश्रीला हाथ लावणारा अजून जन्मलेला नाही, कोणी पुढे आला तर त्याची गय केली जाणार नाही,असे म्हणत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी बाबासाहेब हत्तेकर ,प्रताप बेडगकर ,महेश लोंढे, अमोल रणधीर, कुबेरसिंग राजपूत, प्रकाश जाधव, हे शिवसैनिक उपस्थित होते.
Share Now