मिरज प्रतिनिधी नजीर शेख : अवैधरित्या मुरूम उत्खननावर कारवाई करा, या मागणीचे शिव वाहतूक सेना सांगली यांनी तहसीलदार यांना आज निवेदन दिले.
सिद्धेवाडी येथील मुरूम अवैध्यरित्या उत्खनन करुन रोडच्या कामासाठी वापरला होता म्हणून दि. २८ फेब्रुवारी २०२० रोजी तहसिलदारांना याबद्दल निवेदन देण्यात आले होते , त्या निवेदनात आपण अवैध्यरित्या सुरु असलेले मुरुम उत्खननावर कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता.
परंतु सदरचा मुरुम उपसा हा परवानगीने सुरू होता, असे लेखी उत्तर त्यांनी दिले होते. परंतु सदर मुरुम उत्खननाची राॅयल्टी भरलेली पावती आम्हाला दाखवली नाही , सदर जागेचा स्पाॅट पंचनामा सुद्दा आमच्या समक्ष केला नाही , तरी मिरज तालुक्यात अवैध्यरित्या मुरुम उत्खनन रोडच्या नावावर बेसुमार सुरु आहे व त्याची राजरोसपणे किरकोळ विक्री सुरू आहे , तरी मिरज तालुक्यात सुरु असलेल्या मुरुम उपस्यावर तात्काळ कार्यवाही करावी , अन्यथा शिव वाहतुक सेना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असे परत एकदा शिव वाहतूक सेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे .
या आंदोलनापासुन होणाऱ्या परिणामास तहसिलदार यांची सर्वस्वी जबादारी असेल, असेही या निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी शिव वाहतुक सेना सांगली जिल्हा अध्यक्ष किरणसिंह राजपुत, जिल्हा उपाध्यक्ष गजानन मोरे, मिरज तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शहर अध्यक्ष किशोर बाबर ,सचिन आलकुंटे, आनंद राजपुत, कोमल कवठेकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.