माय लॉर्ड पहिल्यांदा….

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 23 Second

प्रतिनिधी : अजय शिंगे

कोल्हापूर २३ सप्टेंबर २०२०  – भारतीय न्याय व्यवस्था आणि कायदा या विषयावरील सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले आणि  अ‍ॅड.माधुरी काजवे यांनी लिहिलेले माय लॉर्ड हे पुस्तक स्टोरीटेल या स्वीडीशऑडिओ बुक  अ‍ॅप वर पहिल्यांदा ऑडिओ बुक स्वरूपात प्रकाशित झाले.

कोविड १९च्या लॉकडाऊन काळानंतर मराठी प्रकाशन क्षेत्रात घडणारा हा मोठा बदल आहे. नव्या जगात डिजिटलचे महत्व वाढत चालल्यामुळे मराठी लेखक आणि प्रकाशकही ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सच्या माध्यमाचा वापर करू लागले आहेत. २०१७ साली स्टोरीटेलने मराठी ऑडिओ बुक्स अ‍ॅप भारतात आणले आणि अनेक मराठी लेखक ऑडिओ बुक साठी लिहू लागले. अच्यूत गोडबोले हे मराठी साहित्यिकांमधील एक आघाडीचे नाव आहे. त्यांच्या मुसाफीर, किमयागार, अर्थाच, मनात, बोर्डरूम, कॅनव्हास सारख्या पुस्तकांनी विक्रीचे अनेक उच्चांक गाठले. ही सर्व पुस्तके स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत.
 
माय लॉर्ड हे नवे पुस्तक पहिल्यांदा ऑडिओबुक स्वरूपात प्रदर्शित करून नंतर छपाई स्वरूपात आणण्याचा पायंडा मराठीत पाडला जात आहे. माय लॉर्डमध्ये वकिली व न्यायव्यवस्था या विषयावरची खास अच्युत गोडबोले लेखन शैलीत रंजकपणे सांगितलेली सखोल माहिती आहे. अ‍ॅड.माधुरी काजवे यांच्यासह लिहिलेल्या पुस्तकात जागतिक पातळीवर न्याय व्यवस्था कशी उभी राहिली याचा आढावा घेताघेता जगातल्या सर्व महत्वाच्या देशांमधली न्यायव्यवस्था, वकिलांचे तसेच न्यायाधीशांचे किस्से, जगाचा दृष्टिकोन बदलणा-या किंवा कायदा बदलणा-या केसेस, भारतीय न्यायव्यवस्था व कायद्यांवर असलेला प्रभाव, तसेच भारतीय व जागतिक न्यायव्यवस्थेचा इतिहास, सर्वसामान्य माणसांना कोणते कायदे माहिती असायलाच हवेत याची माहिती आणि महत्वाच्या चित्रपट आणि पुस्तकांचे संदर्भ असे हे अतिशय रंजक पण सखोल ज्ञान देणारे पुस्तक आहे.
 
न्याय व्यवस्थेशी संबंधित वकील, न्यायाधीश, अशील, पक्षकार आदींना हे ऑडिओबुक उपयोगी आहेच पण सर्व सामान्य विद्यार्थी आणि वाचकांनाही महत्वाचे वाटेल व पुन्हा पुन्हा ऐकता येईल असे हे ऑडिओबुक झाले आहे. संदीप कर्णिक यांनी माय लॉर्डचे अभिवाचन केले आहे.
 ———————–  जाहिरात ————————–

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *