Getting your Trinity Audio player ready...
|
प्रतिनिधी : शरद गाडे
सांगली येथील सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सर्वोदय विद्यालय सांगली येथे एस.एस.सी. १९९८-९९ च्या बॅच चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.तो दिवस होता रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९. हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा सर्वोदय शिक्षण मंडळ सांगलीच्या अध्यक्षा मा. श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांचे अध्यक्षतेखाली व संस्थेचे सचिव श्री आनंदराव (काका)पाटील , उपाध्यक्ष श्री जी. के (दादा) पवार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दिवसभर सर्वजण आपापला व्यवसाय, वय विसरून गप्पा गोष्टी, जुन्या आठवणी यामध्ये रमून गेले होते. सायंकाळी निरोप घेण्याच्या वेळी श्री दिलीप जाधव, श्री कपिल चव्हाण, श्री कपिल वराळे, श्री अभिजित तवटे , श्री संदीप पाटील ,पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज कलकुटगी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक श्री सूर्यकांत गस्ते व श्री शाहीर पाटील, श्री पी.आय. जाधव या शिक्षकांची भेट घेतली व एक सामाजिक संस्था स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून एक सामाजिक संस्था स्थापन झाली. ती संस्था म्हणजेच अवनी फाऊंडेशन सांगली.
अवनी म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा. ही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झटणारी ही संस्था. संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप जाधव, सचिव श्री कपिल चव्हाण, उपाध्यक्ष श्री अभिजित तवटे, खजिनदार श्री कपिल वराळे, आणि सल्लागार श्री आनंदा ( दादा) लेंगरे हे सक्रिय झाले.आणि पहिले कार्य हाती घेतले ते , ज्या शाळेत आपली जडण घडण झाली, त्या सर्वोदय विद्यालय सांगलीच्या सभागृह नूतनीकरणाचे काम हाती घेतले. आणि अवघ्या दहा बारा दिवसात सर्वोदय विद्यालय सांगलीच्या सभागृहाचे नुतनीकरण करून १ मे २०१९ महाराष्ट्र दिनी त्याचे अनावरण ही पार पडले .
१ मे २०१९ रोजी अवनी फाऊंडेशन चे वतीने श्री महादेव मंदिर परिसर, उत्तर शिवाजीनगर, सांगली येथे पाणपोई सुरू केली.
तसेच शिंदे मळा परिसरात भटक्या जनावरांसाठी पाणपोई सुरू केली. मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठी सुरू केलेली ही पहिलीच पाणपोई असावी.
जून २०१९ मध्ये शैक्षणिक वर्षा च्या प्रारंभी सर्वोदय विद्यालय सांगली, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली व विजयश्री प्राथमिक शाळा सांगली या ठिकाणी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो हे अवनी फाऊंडेशन ने दाखवून दिले.कठीण प्रसंगी तात्काळ मदतीसाठी धावून जाणारी अलीकडेच स्थापन झालेली एक संघटना म्हणून अवनी फाऊंडेशन चा बोलबाला झाला.अन् सांगलीकर जनतेवर ऑगस्ट २०१९ मध्ये महापुराचे संकट आले. याप्रसंगी पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करणेसाठी अवनी फाऊंडेशन ची टीम धावली. पूरग्रस्त भागातील लोकांचे स्थलांतर, जीवनावश्यक वस्तूं चा पुरवठा करणे, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, प्रशासनास मदत करणे इ. कार्य मोठ्या जोमाने केले.
मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा आपल्या देशात शिरकाव झाला. अन् सारा भारत देशच लॉकडाऊन झाला. या काळात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी यांची सुमारे अडीच महिने नाष्टा व चहाची सोय अवनी फाऊंडेशन ने केली. हे सर्व करीत असताना अवनी फाऊंडेशन चा एक उमदा कार्यकर्ता सचिन भोसले यांचे अकस्मिक निधन झाले. अवनी फाऊंडेशन ने त्याच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्याचे कुटुंबावरील दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला.
आज घडीला सांगली जिल्हा कोरोना च्या विळख्यात सापडला असून जिल्हा प्रशासन नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे, जिल्हा लवकरच कोरोना मुक्त करणे साठी प्रयत्नशील आहे. याप्रसंगी गरीब व गरजू कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अवनी फाऊंडेशन ने ऑक्सिजन मशीन खरेदी करणेचे ठरविले अवनी फाऊंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हे कार्य करीत असतानाच सांगलीकर व जगावरील हे कोरोनाचं संकट दूर होऊ दे . याकरिता महाराष्ट्र शासनाच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. स्वतः सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा , असा संदेश ही अवनी फाऊंडेशन आपल्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने देत आहे. या कामी आमचे माजी विद्यार्थी तथा अवनी फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री दिलीप जाधव, सचिव श्री कपिल चव्हाण, खजिनदार श्री कपिल वराळे,उपाध्यक्ष श्री अभिजित तवटे, सल्लागार श्री आनंदा ( दादा) लेंगरे व श्री सचिन शहा,तसेच सदस्य श्री विनोद कांबळे, श्री महेश वडर, श्री अण्णा कलकुटगी, श्री संतोष जाधव हे प्रयत्नशील आहेत.
अवनी फाऊंडेशनच्या या कार्यास आपलाही हातभार असावा ही सदिच्छा.
श्री सूर्यकांत गस्ते,
सहा. शिक्षक.
सौ. ल.पां.पाटील विद्यालय सांगलीवाडी, सांगली.
Mo.9421127535
Avani Foundation
A/c 639801010050500
Union Bank of India
Branch Market Yard Sangli
IFSC UBIN0563986