जनजागृतीत कोल्हापूरचे प्रभावी काम ; रेमडेसिवीरसह अन्य सामग्री दोन दिवसात : पालक सचिव राजगोपाल देवरा

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी
कोल्हापूर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे जागोजागी लावलेले फलक आज पाहिले. मुख्यमंत्री महोदयांनीही मास्क नाही तर प्रवेश नाही या अभिनव उपक्रमाची दखल घेतली. जिल्ह्यात जनजागृतीचे प्रभावी काम दिसत आहे, अशा शब्दात गौरव करुन जिल्ह्याने नोंदविलेल्या मागणीनुसार दोन दिवसात रेमडेसिवीरसह अन्य आरोग्य सामग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी आज दिली.

पालक सचिव  देवरा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड-१९ उपाययोजना बाबत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.

 पालक सचिव  देवरा म्हणाले, सध्या बाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असून कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये विशेष: बाधित रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये विशेष लक्ष द्या. प्रभावी सर्वेक्षण करण्यावर अधिक भर द्या. असेही ते म्हणाले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *