इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे तर्फे विकसित २ आयुर्वेदिक  “केमो रिकव्हरी कीट्स”चे  उद्घाटन      

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 11 Second

विशेष प्रतिनिधी रवी जगताप

कोल्हापूर : कॅन्सर सारख्या आजारावर आयुर्वेद आणि अलोपथी ह्यांनी एकत्र येऊन उपचार करणे रुगणांच्या हिताचे असून भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट द्वारा संशोधन करून पेटंट  करण्यात आलेले केमो रिकवरी किट हे कॅन्सर रुगणांच्या जलद उपचारासाठी हे वरदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी ह्यांनी राजभवनात झालेल्या केमो रिकव्हरी कीट्स लोकर्पण कार्यक्रमात बोलताना केले.

भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्ट संचालित इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे तर्फे अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड व्दारे २ आयुर्वेदिक औषधी योग “केमो रिकव्हरी कीट्स”चे (आयुर्वेदिक चिकित्सा केमोथेरपी मुळे उद्भवणारे उपद्रव कमी करण्यासाठी) उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . 
 या कार्यक्रमाला पद्मभूषण अशोक कुकडे, पद्मभूषण देवेंद्र त्रिगुणा, प्रमुख संशोधक वैद्य सदानंद सरदेशमुख, जेष्ठ उद्योगपती रतन टाटा आदि मान्यवर ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. 
 
 
“शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेद चिकित्सा पद्धति मध्ये सातत्याने संशोधन करत राहण्याची गरज आहे. आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितिसाठी फक्त मार्केटिंग च्या मागे न लागता संशोधनावर अधिक भर देण्याची सध्या आवश्यकता असल्याचे  कोशियारी पुढे म्हणाले. कॅन्सर च्या उपचारासाठीच्या या संशोधनाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून द्यायला पेटंट उपयोगी पडणार असून टाटा ट्रस्ट ह्या मध्ये सहभागी असल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण रतन टाटा ह्यांनी  ह्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 
 
भारतीय संस्कृति दर्शन ट्रस्टच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अॅड रिसर्च सेंटरने गेल्या २५ वर्षांतील क्लिनीकल काम आणि संशोधनावर आधारित तसेच २०१५ पासून टाटा ट्रस्टब्दारे संशोधनासाठी मिळालेल्या अनुदानामुळे कॅन्सरवरील ७ आयुर्वेदिक औषधी योगांची पेटंटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४ आयुर्वेदिक औषधी योगांच्या पेटंटची आंतरराष्ट्रीय पातळीवरही नोंदणी करण्यात आली आहे. तसेच ही ४ भारतीय पेटंट प्रकाशित झाली आहेत.केमोथेरॅपीमुळे उद्भवणारे उपद्रव आयुर्वेदिक चिकित्सेने कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर “केली रिकव्हरी कीट्स” या नोंदणीकृत २ पेटंट आयुर्वेदिक औषधी योगांचे उद्घाटन करीत आहे. हे आयुर्वेदिक औषधी योग पारंपारिक कॅन्सर आधुनिक चिकित्सेबरोबर वापरण्यास उपयुक्त आहेत. यापैकी एक केमो रिकव्हरी किटमध्ये हर्बो मिनरल मेटॅलिक (वनस्पती – खनिज व धातू संयोजन) आहे. या कीटमधील महत्वाचे घटकद्रव्य म्हणजे आयुर्वेदिक संहितांमध्ये कायाकल्प करणारे रसायन तसेच शरीरशुध्दीकर म्हणून वर्णित बहुमोल सुवर्णभस्म होय. दुस-या केमो रिकव्हरी कीटमध्ये हर्बोमिनरल (वनस्पती व खनिज संयोजन) औषधे आहेत.
 
हे आयुर्वेदिक औषधी योग बाजारात नामांकित अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, वाघोली, पुणे व्दारा येणार आहेत. अथर्व नेचर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही FDA व GMP प्रमाणित आयुर्वेदिक औषधनिर्मिती करणारी कंपनी आहे. या कीटमधील आयुर्वेदिक औषधे नामांकित प्रयोगशाळांव्दारा आधुनिक निकषांवर प्रमाणित आहेत. कॅन्सरग्रस्त रूग्णामध्ये केमोथेरपी मुळे उद्भवणारे उपद्रव कमी करण्यासाठी तसेच आयुष्याची गुणवत्ता उंचावण्यासाठी वापरलेल्या या कीटसची उपयुक्तता पडताळून पहाण्यात आली आहे.
 
ह्या किट द्वारे एकूण ७ पेटंट दाखल करण्यात आली असून त्यातील ४ प्रत्यक्ष प्रकाशनाच्या टप्प्यात आली आहेत. ह्या किट मध्ये प्रामुख्याने सुवर्णभस्म, प्रवाळयुक्त अशा विविध संशोधीत व टाटा रिसर्च सेंटर द्वारा प्रमाणित औषधंचा वापर करण्यात आला असून जवळपास १४,००० रुगणांवर आता पर्यंत ह्याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे.
 
 ट्रस्ट चे विश्वस्त वैद्य सुकुमार सरदेशमुख ह्यांनी आभार व्यक्त केले.
 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *