Share Now
Read Time:1 Minute, 13 Second
विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे
सांगली : नाशिक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मंजूर केल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरातून या कायद्याच्या विरोधात आंदोलन घेण्यात आले होते.
या आंदोलनावेळी नाशिक येथे महाराष्ट्राची महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात, सांगली काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन भाऊ पाटील तसेच काँग्रेस पक्षाचे अन्य नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now