विशेष प्रतिनिधी : विराज पाटील
सांगली : जिल्हा कारागृहातील पाच कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या कैद्यांवर सांगलीतील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या महिला वसतिगृह येथे कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर होताच या कैद्यांनी तेथून पलायन केले होते. सांगलीतील गुन्हे अन्वेषण पथकाने या कैद्यांचा तपास काढुन त्यांना परत जेलबंद केले.
माननीय पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या कैद्यांना पकडण्यासाठी दोन पथक तयार केली होती.
या आदेशानुसार तपास करत असताना १) राजू नागेश कोळी रा. काळी वाट हरिपूर २) नाग्या बाळू जगदाळे रा. पोळ मळा ३) राकेश शिवलिंग हदिमानी ४) दीपक आबा ऐवळे ५) शंकर कलढोणे या कैद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील बिरोबा नरळे व संतोष गळवे यांनी गोपनीय माहिती काढून या कैद्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात घेतले.