लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन रस्त्यावर एकवटला.”स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर” हा निर्धार करतच …..

कोल्हापूर (दिनेश चोरगे) : युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या ७५ व्या महास्वच्छता अभियानात युवा पत्रकार संघाने मोठया संख्येने सहभाग घेतला .

 

‘साथी हात बढाना’ म्हणत लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन ताराराणी चौकात एकवटला.”स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर” हा निर्धार करतच…….

 

महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते ताराराणी चौकात महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ झाला. हा महास्वच्छता अभियानाचा ७५ वा रविवार होता.

ताराराणी चौक परिसर, हॉटेल पंचशील चौक, राजीव गांधी पुतळा परिसर, दाभोलकर कॉर्नर, शाहूपुरी पोलिस ठाणे परिसर, गोकुळ हॉटेल परिसर, व्हिनर्स कॉर्नर ते दसरा चौक परिसर येथे सकाळी ७ वाजल्यापासून ते ९ वाजेपर्यंत महास्वच्छता मोहिमेत कोल्हापूर युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष सुशांत पोवार, जिल्हाध्यक्ष जावेद देवडी, प.महाराष्ट्र अध्यक्ष नवाब शेख, प्रदेश उपाध्यक्ष राकेश पोलादे, सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कुरणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश जाधव, बाबुराव वळीवडे, शरद गाडे, भुदरगड तालुकाध्यक्ष समीर मकानदार, रत्नदीप चव्हाण, मुबारक अत्तार, करवीर तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, मुरलीधर भोसले, राजू चौगुले, प्रदीप पवार, नितीन ढाले, योगेश दंडवले, पांडुरंग डबर, संभाजी पाटील, अभिजित भोसले, अजय शिंगे, रोहित वज्रमट्टी, नियाज जमादार, डी. एस. कोंडेकर, अतुल पाटील, रत्नदीप चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना नार्वेकर, गायत्री माजगावकर, महिला प. महाराष्ट्र अध्यक्ष अर्चना चव्हाण, गीता भंडारे, मनीषा हेगडे, यासह पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी व सभासद यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

याबरोबरच उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक मधुकर चौगले, स्वरा फौंडेशनचे संस्थापक प्रमोद माजगावकर यांनीही महास्वच्छता अभियानात हातात झाडू घेऊन प्रमुख उपस्थिती दर्शवली.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *