कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, कोल्हापूरच्या विकासाला खेदजनक :स्वरा फौंडेशन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 30 Second

विशेष प्रतिनिधी :अजय शिंगे

कोल्हापूर : महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढत अत्यंत प्रामाणिकपणे अविरतपणे कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे.

“स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर ” निर्धार करत आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी लोकसहभागातून रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीम राबवून स्वतः रस्त्यावर उतरून हातात झाडू घेऊन अत्यंत तळमळीने काम केले.
त्यांच्या महास्वच्छता योजनेचे राज्यात शहरातच नव्हे तर राज्यात ही कौतुक झाले असून लोक त्यांना “स्वच्छता दूत” म्हणूनच ओळखतात.

 महास्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्ती कोल्हापूर, जनकल्याण कारी योजना , यामध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या अमलात आणल्या.

 जयंतीनाल्याचा अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न सोडवत म्हास्वच्छता मोहिमेतुन स्वच्छता करून जयंती नाल्याला पूर्वीप्रमाणे जयंती नदीच स्वरूप आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्राप्त करून दिले.

अशा कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, ही कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसण्यासारखे व खेदजनक आहे. ही बदली रद्द व्हावी, तसेच या बदलीबाबत पुनर्विचार व्हावा, यासाठी स्वरा फाउंडेशन तर्फे मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, प्राजक्ता माजगावकर, अमित देशपांडे, अवधूत भाटे हे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *