प्रतिनिधी : जावेद देवडी
बांबवडेत छत्रपती शिवाजी महाराजांचा
पुतळा पुन्हा सन्मानाने प्रतिष्ठापीत करा
करवीर भाजपची मागणी
सर्व भारतीयांचे श्रध्दास्थान, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांबवडे (ता. शाहुवाडी) येथे सन्मानपूर्वक विधिवत प्रतिष्ठापित करा, अशी मागणी करवीर तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली.
तसे निवेदन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले.
बांबवडे येथे पोलीस व स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविला,
हि बाब निंदनीय आणि निषेधार्ह आहे.
या प्रकारामुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तेथील पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने ताबडतोब वीधीवत पूजा करून पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करावी, अशी मागणीही भाजप कार्यकर्त्यांनी भांडवलकर यांच्याकडे केली. निवेदन देताना भाजप महिला मोर्चा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुलोचना नार्वेकर, करवीर तालुका उपाध्यक्ष उमेश पाटील, कल्पना टोमके, ज्योती सुतार, नंदा जगदाळे, अमर भोसले, सचिन पाटील, नितीन सावंत, दिपक मुदुगडे, रेखा चौगुले, पंकज यमगर्णी, राजू टोमके आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
———————— जाहिरात ———————–