संजयगांधी कमिटीवर गडमुडशिंगीचे युवक काँग्रेसचे संतोष कांबळे यांना संधी

प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर

गडमुडशिंगी ता.करवीर येथील पालकमंत्री सतेज पाटील . व आमदार ॠतुराज पाटील. यांचे विश्वासू सहकारी संतोष कांबळे यांची संजयगांधी निराधार योजनेच्या कमिटीवर सदस्यपदी निवडीची शिफारस कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील. कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा ॠतुराज पाटील यांनी केली. संतोष कांबळे यांनी काँग्रेसच्या विविध पदावर काम करून आपला ठसा उमटवलेला आहे. 

जिल्हा  युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष. जिल्हा सदस्य. अनुसूचित जाती विभाग. केंद्र- राज्य योजना सहनियत्रंण समिती. रूग्ण कल्याण समिती सदस्य.अशा विविध पदावर प्रामाणिक पणे काम केलेले आहे. २००४ च्या निवडणुकी पासुन बंटी यांच्या बरोबर निष्ठेने काम करत आहेत.नामदार सतेज पाटील साहेब. दक्षिणचे आमदार.मा. ॠतुराज पाटील .प्रतिमा पाटील (वहीणी) साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजना सामान्य माणसांपर्यत पोचवण्यासाठी ते अग्रभागी आहेत.संजयगांधी/श्रावणबाळ योजना,मतदान नोंदणी, जेष्ठ नागरिक ओळखपत्र, जनश्री विमा योजना, जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत  योजना,सतेज उर्फ बंटी पाटील सभासद नोंदणी,पदवीधर मतदार नोंदणी, डाॅ.डी.वाय.पाटील ट्रस्ट यांचेवतीने अप्रशिक्षण योजना,राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्ड, बांधकाम मजुर नोंदणी, घरेलु कामगार योजना,जिल्हा उद्योग केंद्र. अंतर्गत दुग्धजन्य पदार्थ प्रशिक्षण योजना.

अशा विविध योजनाचा लाभ सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे.

Advertisements

संजय गांधी/श्रावणबाळ योजनेच्या पेन्शन पुन्हा नव्याने चालु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *