कोल्हापूर : जावेद देवडी
अखिल विश्वाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणाऱ्या प्रेषित मुहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लेमीन पक्षाच्या वतीने कोल्हापूर व रेंदाळ शाखेकडून होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व अनाथाश्रमध्ये फळ वाटप करण्यात आले.
दरम्यान पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख यांनी हजरत मुहम्मद पैगंबर स. यांनी जगाला एकेश्वरवाद प्रदान करुन वर्ण-वंश-जात-रंगभेद आदी भेदांना दूर सारुन समतेवर आधारलेली संस्कृती, समाजव्यवस्था आणि स्त्रियांना संपत्ती, शिक्षण यात समान अधिकार प्रदान केले,तसेच तालुकाध्यक्ष सलमान नाईकवाडे यांनी प्रेषित मुहम्मद पैगंबर स.यांचा संदेश आज विश्वाला तारु शकतो असे प्रतिपादन केले.शहरअध्यक्ष मोहसीन हकिम यांनी आभार मानले.
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रथा.शाहिद शेख, इलियास कुन्नूरे,सुहेल शेख,तौसीफ मोमीन,अय्याज मुजावर, तालुका अध्यक्ष सलमान नाईकवाडे ,तालुका उपाध्यक्ष मोहसीन हकिम ,शहर अध्यक्ष सद्दाम हकिम,उपाध्यक्ष मोहद्दीन मुजावर , शहर सचिव रमजान जमादार ,आयुब हकिम ,बालेचाँद मुजावर ,तौफिक जमादार,समीर हकिम,बिलाल हकिम ,आरमान जमादार,साहील जमादार,अमीन तहसीलदार,शब्बीर हकिम आदी मान्यवरांसह विविध समुहातील जाती जमातीचे प्रतिष्टित नागरिक विद्यार्थी उपस्थित होते