प्रतिनिधी अतुल पाटील
नवरात्रीचे नऊ रंग घालून फोटो काढण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करून बघा त्यात खरच मोठा आनंद आहे. आज बावेली धनगरवाडा येथे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पण एक दीड कि.मी चालत जाव लागते त्या लोकांसाठी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी थोडी मदत पोचवली गावात दुकान असल्यामुळे ज्या मुलांना चॉकलेट .केक. बिस्किट्स दोन-तीन महिन्यांनी देखील बघायला मिळत नाही त्यांच्या हातात केक चक पॅकेट आणि चॉकलेट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद बघून खरंच समाधान वाटलं… गोरगरीब लोकांना सुद्धा प्रत्येकी एक-एक किलो कडधान्य वाटप केल त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून मन समाधान झाल. घरी परत येताना आजीने आग्रहाने आणि आपुलकीने बनवलेला तो कोरा चहा त्या अमृततुल्य पेक्षा सुद्धा छान होता आपण खरं तर खुप नशिबवान आहोत की आपल्याला सगळ्या सुविधा मिळतात पण अशी ही लोक आहेत समाजात त्यांना मदतीची गरज असते.
वर्षा विलास गुरव रा.सावर्धन
स्नेहल बंडोपंत डवर रा.चोरवाडी
अमृता पाटील .पूजा डवर .रोहन पाटील .विपुल पाटील . ऋतूकेश पाटील आणि राहुल सर यांनी हा कार्यक्रम राबविला