मा. चंद्रकांत (दादा) पाटील ,प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते मा. सुरेश (बापू) आवटी युवा मंच ,मिरज यांच्या वतीने मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना कर्तव्यदक्ष कोरोना योद्धा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
सांगली-कुपवाड-मिरज महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारी च्या काळात महापालिकेच्या पदाधिकारी कर्मचारी आरोग्य यंत्रणा यांना घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना व खबरदारी नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांना दिलेली समाधानकारक सेवा याची दखल घेऊन सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मा.सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्या वतीने मा. चंद्रकांत दादा पाटील प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष कोरोना योद्धा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांना ही सन्मानित करण्यात आले ..वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रवींद्र ताटे सर, डॉ. रेखा खरात, डॉ. अक्षय पाटील ,सतीश कांबळे ,आरोग्य विभागातील दिलीप मद्रासी,अनिल मदरगी यांना सन्मानित करण्यात आले . युवा मंचचे सर्व पदाधिकारी प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.