सुलोचना नार्वेकर (प्रतिनिधी) – वसगडे ( ता.करवीर) येथील श्री विठ्ठल बिरदेव वार्षिक यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर भाविक , मानकरी ,व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. कोरोना वर्षाअखेरीस संपुष्टात येईल, मिरची भडकेल, पाऊसमान वाढेल कडधान्य महाग होतील, रोहिणीचा पेरा सादल, तांबडं रास मध्यम राहील ,काळी रास सुकळ जाईल, अतिरेकी संकट येईल, दुधाचे भांडी आणि उसाची कांडी यामुळे राज्यात राजकारणाला कलाटणी मिळेल, जनावरांचे किमती वाढतील, राजकारणात स्त्रिया बाजी मारतील, एंदा पेरणीचा गैरमेळ उडल, आणि माझी जो सेवा करील त्याला कांबळया खाली घेईन अशी भाकणूक फरांडेबाबा आबा नामदेव वायकुळे यांनी केली.
बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास फरांडे बाबा यांचे आगमन वसगडे येथील मानाच्या गादीवर झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत गावातील मानकरी यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. यावेळी दुपारी बारा वाजता फरांडे उठवण्याचा सोहळा ढोल कैताळाच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत पार पडला. यावेळी फरांडे बाबा मानाच्या गाधीवरून मंदिराकडे फरांडे बाबांनी प्रस्थान केले. मंदिराच्या मुख्य गाभार्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणूकीस प्रारंभ झाला. वर्षाखेरीस कोरोना संपुष्टात येईल, मिरची महागेल, पाऊस मान जास्त वेळ राहील, कडधान्य महागेल. मात्र माझी सेवा करतील त्या सर्वांना कांबळयाखाली घेईल, असाही आशीर्वाद फरांडेबाबांनी दिला. अशी भाकणूक आबा वायकुळे, रा.तीरसाळ तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद यांनी केली.
या धार्मिक विधीस यात्रा कमिटीचे संजय पाटील गावचे सरपंच नेमगोंडा पाटील उपसरपंच रतन कारंडे ग्राम विकास अधिकारी जी.डी. गिरीगोसावी, ग्रा प सदस्य विठ्ठल धनगर संदीप कामत संदीप भोसले वर्षा कांबळे गाव कामगार तलाठी सुभाष बंडगर, गावातील मानकरी या सोहळ्यास प्रमुख उपस्थित होते. यात्रे वेळी गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
कोरोना वर्षाखेरीस संपुष्टात येईल परांडे बाबांची भाकणूक

Read Time:3 Minute, 8 Second