कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते…कोण म्हणत तो भावनाशून्य असतो.

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 5 Second

विशेष प्रतिनिधी: अतुल पाटील

कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते…कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो.खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो.

सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस बीट अंमलदार बजरंग पाटील.

राधानगरी तालुक्यातील राधानगरी, बनाचीवाटी, हुडा, भैरीबांबर, रामणवाडी, फोजिवडे, एजिवडे , न्यु-करंजे, राउतवाडी, हसणे, दाजीपुर, ओलवण, डिगस, कारीवडे , गणेशवाडी, पडळी, सावर्धन, कासारवाडी, पिरळ, चौगलेवाडी, दुर्गमानवाड, संतुपाटीलवाडी, नानापाटीलवाडी, तळगाव, भोगुलकरवाडी, चाफेवाडी,
पडसाळी,चौके, कंदलगाव, चव्हाणवाडी, सोनारवाडी, मानबेट, राई, मांडवकरवाडी या बीटसाठी पो.हवालदार बजरंग पाटील हे आहेत. या सर्व गावातील पोलीस पाटील व बजरंग पाटील यांच्या पोलीस स्टेशन कामाबाबतची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. वेळच्या वेळी या योग्य समन्वयामुळे सर्व कामे लिलया पार पडतात.

आज दीपावली पाडव्यानिमित्त राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये बजरंग पाटील साहेब यांनी या सर्व बीट मधील पोलीस पाटील यांना सस्नेह भेट म्हणुन मिठाई, साबण, तेल वगैरे साहित्य भेट देवुन पोलीस आणि पोलीस पाटील आतील अंतर कळूच दिल नाही. आज दीपावली निमित्त स्नेहमय, आपुलकी प्रेम दीपावली शुभेच्छा देऊन सर्वांची मने जिंकली पोलीस पाटील यांच्यात एक उत्साह चैतन्य निर्माण केले.

एरव्ही पोलीस म्हंटले की, कायदा, बडगा, भिती. काही ठिकाणी तर पोलीस-पब्लीक संघर्षसुद्धा पहावयास मिळतो. काही कर्तव्यदक्ष, तापट अधिकारी, कर्मचारी देखील पोलीस दलात आहेत. परंतु जशा नाण्याला दोन बाजु असतात तसे मनमिळावु, शांत संयमी पण कर्मचारी आहेत. बीट कार्यक्षेत्रात एवढी गावे असुनही संबंधीत पोलीस पाटील व बजरंग पाटील यांचे नाते हे या उदाहरणावरुन काही विशेषच वाटते. एवढा समन्वय पहावयास मिळणे कदाचित कठीणच…
खाकीतल्या या ‘बाप’माणसाला एक सलाम व्हायलाच हवा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *