उपसंपादक : अजय शिंगे
स्वरा फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमात आणखीन एक मानाचा तुरा…
वर्षातील सर्वात मोठा सण दिपावलीच्या पूर्वसंध्येला सुरुवात होते ती बोचरया थंडीची.आपन चार भिंतिच्या आत राहत असल्याने आपल्याला म्हणावी तितकी ठंडी वाजत नाही. पन जे फिरस्त लोक ज्याना ना चार भिंतिचा आधार ना ठंड़ीपासुन बचाव. आशा लोकांना स्वरा फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट चादर शाल व पाण्याची बॉटल रोज रात्री कोल्हापूर शहरात प्रवेश द्वार, (तावडे हॉटेल पासून) ते पूर्ण शहरात फिरस्ते बे घर लोकांचे बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन, सीपीआर चौक, रंकाळा स्टॅन्ड, भवानी मंडप, रोडच्या कडेला दुकानाच्या कटडयाची आधार घेत रस्त्याच्या कडेला कुडकुडत झोपलेल्या लोकांचे शोध घेऊन त्यांना
तुमची काळजी घेणारे कोणी नसतील तर आम्ही आहोत असे मायेची उब देत ब्लॅंकेट,चादर, शाल पाण्याची बॉटल देऊन सामाजिक उपक्रम राबवले जात आहे,
स्वरा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद माजगावकर , आमच्या प्रतिनिधीशी बोलतानात
तत्कालीनकोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, मा श्री मल्लीनाथ कलशेट्टी सध्या कार्यरत असलेले (राज्य संचालक-भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे) यांचे आदर्श घेऊन यांच्या प्रेरनेणे ,मार्गदर्शनाखाली व स्वरा फाउंडेशन च्या वतीने ठंड़ीपासुन बचावासाठी ब्लैंकेट, शाल, चादर, देण्याची मोहिम सुरु करण्यात आली. स्वरा फाउंडेशन ची संपूर्ण टिम ठिकठिकाणी रोज रात्रि आशा लोकांना ब्लेंकेट शाल चादरी देत आहे.
डायरेक्टर सौ.प्राजक्ता प्रमोद माजगावकर, म्हणाल्या आज आम्ही फिरस्तेनां ब्लॅंकेट , शाल, चादर पांघरून घालताना त्यांच्याशी बोलणे केल्यानंतर त्यांची थंडीतील अवस्था नकळत दिसून आली त्यांनी खूप प्रेमळ मनाने आम्हाला आशीर्वाद दिले मनाला खूप चांगले वाटले.
उपाध्यक्ष पियुष हुलस्वार बोलताना म्हणाले
स्वरा फाउंडेशनच्या सभासद पदाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात चटई क्षेत्राप्रमाणे विस्तारली आहे आज पर्यंत फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण,कोल्हापूर स्वच्छता मोहीम अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे यापुढेही सामाजिक उपक्रम राबवणार असून शासनाच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमांमध्ये स्वरा फाउंडेशनला सहभाग करून घेतल्यास आमची संपूर्ण टीम जबाबदारीने पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे,