विशेष प्रतिनिधी इरफान शेख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मंदिर मज्जीद सर्व धार्मिक स्थळे राज्य शासनाने येत्या दीपावली पाडवा निमित्त सर्व नागरिक भक्तांसाठी खुली होणार अशी घोषणा करत असतानाच मिरज येथील दत्त चौक लक्ष्मी मार्केट मध्ये मात्र सोशल डिस्टन्सचा फज्या मात्र उडाला आला आहे.
कोरोना विषाणू सारख्या महामारीचा अजून धोका टळला नाही.
राज्यातील सर्व शासनस्तरावर खबरदारी घेत असून मात्र सां. मि. कु. स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आरोग्य अधिकारी पोलीस प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे.
नागरिकांना वेळोवेळी सूचना देऊन नागरिकाकडून याबद्दल नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दंडात्मक कारवाई करून खबरदारी उपाय योजना करणे जरुरीचे आहे .
अशे न करता केवळ व्यापाऱ्यांच्या हितासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.
व्यापारी व नागरिक कोरोना विषाणू महा मारीचा गांभीर्य लक्षात घेऊन शासनास सहकार्य करून खबरदारी घेणे ही जरुरीचे आहे तितकेच खरे,