राधानगरी प्रतिनिधी: अतुल पाटील
राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मिथुन मारुती पारकर यांची बिनविरोध निवड झालीय, पारकर हे राधानगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण उपसरपंच ठरले. निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच कविता दीपक शेट्टी होत्या.पारकर यांच्या निवडीनंतर समर्थक तरुणांनी एकच जल्लोष केला.
राधानगरी ग्रामपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता आहे. आघाडीच्या ठरलेल्या समझोत्यानुसार उपसरपंच संजय कांबळे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त होते. मिथुन पारकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एम आर गुरव यांनी काम पाहिले.निवडीनंतर उपसरपंच मिथुन पारकर यांचा सरपंच कविता शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आघाडीप्रमुख दीपक शेट्टी,मारुती टिपूगडे, सुरेश पाटील, मारुती पारकर,युवराज पाटील,यांच्यासह मावळते उपसरपंच संजय कांबळे, शत्रूग्न सांगावकर,महेश अडसूळ, रामराव टेपुगडे, संतोष टेपुगडे, भाग्यश्री पाटील, आनंदी पाटील, कविता चांदम, अनुराधा तायशेट्ये, भारती कुंभार, जयश्री कळमकर, सरिता बालनकर,सरिता शिंदे आदी उपस्थित होते.