पत्रकार दिनानिमित्त महिला पत्रकारांचा सन्मान…..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 29 Second

 

दि.७ युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

 ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा पुणे येथे राज्य महिला कार्यकारणी व पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर केले,


संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना
पत्रकार हा नीपक्ष निर्भीड चारित्र्य संपन्न असला पाहिजे सर्वसामान्य लोकांचे पत्रकार यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न्यायिक व आशावादी आहे अशा विश्वास ठेवणाऱ्या वाचक वर्ग सर्वसामान्यांचे हित पत्रकारांनी जपले पाहिजे अन्यायाविरुद्ध लिखाण करीत असताना आपल्यावरही अन्याय होतो याची जाण युवा पत्रकार संघाने ठेवून अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी पत्रकार व पत्रकार कुटुंबाच्या कल्याणासाठी ९/९/२००९ रोजी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र कोल्हापूर येथे स्थापना करण्यात आली,

संघाच्यावतीने आज पर्यंत प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांची एक जुटीन निर्माण केली पत्रकारांची एकजुटीमुळे अनेक प्रश्न सोडवण्यात यश आले इथून पुढेही पत्रकारांसाठी शासन स्तरावर असलेल्या योजना मिळवण्याचे प्रामुख्याने प्रयत्न राहील राज्यामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत प्रत्येक संघटनेचे ध्येय उद्देश घटना वेगळी असून महिला पत्रकारांना अल्प प्रमाणात संघटनेच्या पदाधिकारी पदांमध्ये संख्या कमी असतो पण युवा पत्रकार संघाने २०२१ नूतन वर्षानिमित्त महिला पत्रकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून स्वातंत्र विभागणी केली आहे,

त्यामध्ये राज्य महिला अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष, जिल्हा महिला अध्यक्ष, तालुका महिला अध्यक्ष, व प्रदेश महिला अध्यक्ष अशा पद्धतीने कार्यकारिणी तयार केली असून त्याची सुरुवात मेट्रो सिटी पुणे जिल्ह्यामध्ये राज्य महिला अध्यक्षपदी अर्चना चव्हाण व राज्य महिला कार्याध्यक्षपदी अस्मिता जाधव पुणे शहर महिला अध्यक्षपदी सुरेखा मेंढे यांची निवड करून पत्रकार महिलांचा मोठा सन्मान केला आहे. पुढील कार्यकारणी त्या-त्या जिल्ह्यामध्ये त्या-त्या तालुक्यामध्ये राज्य महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य संघटक पदी राहुल नळकांडे , पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी संतोष सावंत, पुणे जिल्हा अध्यक्ष दयानंद वाडकर, प्रदेश सचिव संतोष भोसकर यांची प्रामुख्याने निवड करण्यात आली,

प्रदेश उपाध्यक्ष संपादक जितू कळंत्रे यांनी विविध योजनांची माहिती दिली, विशेषता म्हणजे पुणे जिल्हा पदाधिकारी त्यांच्याकडून सभासद वर्गणी म्हणून संघास 12 हजार रुपये रोख रक्कम संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळीराज उपाध्यक्ष जावेद देवडी प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कुरणे कोल्हापूर जिल्हा सचिव संतोष पवार व मोठ्या संख्येने पत्रकार हितचिंतक उपस्थित होते,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *