प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर धावणार कोल्हापूरची सुवर्णकन्या

(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे येत्या प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे.

हे ७२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १४ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण करुन जागतिक विक्रम नोंदवण्याचा तिचा मानस आहे .तिचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास ६-७ फेब्रुवारी रोजी जागतिक सर्वसाधारण विजेतेपदासाठी १०० किलोमीटर अंतराच्या ए आय यु एशिया ओसीनिया मॅरेथॉन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आसमा कुरणे हिला मिळणार आहे . आसमा कमला कॉलेज कला शाखेची तृतीय वर्षांची विद्यार्थिनी असून तिचे कोच शामराव मासाळ सर आहेत .प्रजासत्ताक दिनी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटरचे अंतर तिने १४ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद होणार आहे. तसे झाल्यास कोल्हापूरचे नाव जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरात लिहिले जाणार आहे .

Advertisements

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी ६ वाजता आसमा कुरणे कमला कॉलेज च्या आवारातून आपल्या जागतिक विक्रमासासाठी धावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे .कुठेही न थांबता सलगपणे धावून आपला विक्रम नोंदवण्याचा तिचा मानस आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *