प्रथम साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला उपस्थिती
प्रतिनिधी : अर्चना चव्हाण
शिर्डी दि २३ महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्यावतीने. मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ या राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. ‘ मान कर्तृत्वाचा , सन्मान नेतृत्वाचा ‘ राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा – २०२१ शिर्डी येथे संपन्न झाला.
स्वागत सरपंच सेवा संघाचे संस्थापक सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी केले.
पुरस्कार सन्मान सोहळ्याचे वितरण खासदार सदाशिवराव लोखंडे,समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख,,,ग्रामसेवक संघटनेचे राज्यध्यक्ष एकनाथराव ढाकणे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,मानचिन्ह, फेटा व शाल असे होते.
या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, मिडिया कंट्रोल मुख्य संपादक आदर्श पत्रकार पुरस्कार शिवाजी शिंगे (कोल्हापूर), यांना तर, आदर्श सरपंच जितेंद्र यशवंत(गडमुडशिंगी कोल्हापूर), यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकारितेत उपसंपादक सुरेश राठोड, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सागर धुंदरे, दैनिक लोकमतचे पत्रकार दिपक मेटील, आदर्श ग्रामसेवक शिवाजीराव वाडकर,उधोजिका स्मिता लंगडे, सहकार पार्वती लुगारे पाटील, क्रिडा भूषण पंचम पाटील,उधोजिक दत्ता पाटील, शिक्षिका सविता पाटील, आदर्श सरपंच महादेव पाटील,
,यांच्यासह
,युवारत्न, प्रशासकीय,उद्योग भूषण सेवा,सामाजिक, शैक्षणिक,कोरोना योध्दा,, कृषी,व्यापार,कला, राजकिय,महसूल,वैद्यकीय,
ऐतिहासिक,दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून करण्यात आला. सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष जावेद देवडी, कोल्हापूर जिल्हा सचिव संतोष पोवार , अध्यक्ष भाऊ मरगळे,राज्यध्यक्ष विक्रम भोर,मार्गदर्शक जयदीप वानखेडे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,स्वागताध्यक्ष प्रदीप हासे,कार्याध्यक्ष रवींद्र पवार, शंकरराव खेमनर,भाग्यश्री नरवडे,अँड भाऊसाहेब गुंजाळ, सौ कोमल शिवाजी शिंगे, पंकज चव्हाण, स्नेहा शिवाजी शिंगे, रविराज गाटे, गणेश तायडे,अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम आदी उपस्थित होते.