प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अवघ्या ९ तास २८ मिनिटांत धाऊन कोल्हापूरची आसमा ठरली सुवर्णकन्या

(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम अवघ्या ९ तास २८ मिनिटांत ७२ किलोमीटर धाऊन विक्रम करुन सुवर्ण कन्या ठरली.

तिचा हा उपक्रम यशस्वी झाल्याने ६-७ फेब्रुवारी रोजी जागतिक सर्वसाधारण विजेतेपदासाठी १०० किलोमीटर अंतराच्या ए आय यु एशिया ओसीनिया मॅरेथॉन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी मार्ग मोकळा झाला आहे

Advertisements

भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आसमा कुरणे याला मिळणार असुन.आसमा कमला कॉलेज कला शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून तिचे कोच शामराव मासाळ सर आहेत.

आसमाने कमी वेळेत विक्रम केल्याने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद होण्यास संधी असून कोल्हापूरचे नाव जागतिक नकाशावर सुवर्णाक्षरात लिहिले जाणार आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन सकाळी ६ वाजता आसमा कुरणे कमला कॉलेजच्या आवारातून आपल्या जागतिक विक्रमासाठी धावण्याच्या उपक्रमांचा शुभारंभ करून कुठेही न थांबता सलग पणे धावून आपला विक्रम नोंदवला. तिचे सर्वत्र कौतुक होत असून शुभेच्छा चे वर्षाव होत आहे.

One thought on “प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अवघ्या ९ तास २८ मिनिटांत धाऊन कोल्हापूरची आसमा ठरली सुवर्णकन्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *