कोल्हापुर : ग्रामीण पत्रकारांच्या उन्नती साठी युवा पत्रकार संघाचा पुढाकार : संघाच्या महिला आघाडी ची गडहिंगलज तालुक्याची धुरा चित्रा शिंदे यांच्यावर

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 51 Second

कोल्हापुर (प्रतिनिधी) : महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. याची नोंद घेत युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यानी युवा पत्रकार संघाच्या गडहिंगलज तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा दोन्ही क्षेत्रात अघाडीवर असणाऱ्या नेसरी येथील महिला पत्रकार सौ.चित्रा शिंदे यांची निवड केली आहे 

युवा पत्रकार संघाच्या महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.अर्चना चव्हाण यांच्या हस्ते त्याना समारंभपूर्वक निवडीचे पत्र देण्यात आले.
संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा सचिव संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला .

युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे व आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सकाळचे नेसरी प्रतिनिधी पत्रकार दिनकर पाटील यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यानी राज्यभरातून युवा पत्रकार संघाच्या परिवाराचे सक्रिय सदस्य होणाऱ्या पत्रकार बांधवांना वाढता ओघ उत्साह वाढवनारा असल्याचे नमूद केले .

दुर्दैवाने श्रमिक पत्रकारांच्या हितासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे त्यानी स्पष्ट केले. मासिक वेतना ऐवजी तूटपंजे मानधन आणि अपूरे कमीशन यामुळे श्रमिक पत्रकार आणि त्यांच्या उदरनिर्वाह चिंतेचा विषय आहे .

याबाबत भविष्यात शासकीय पातळीवर पाठपुरावा करून गृहनिर्माण योजना, पेंशन मंजूरी, विमा योजना,आरोग्य विमा, संरक्षण, श्रमिक पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियाना कशी मिळवून देता येईल, यावर भर देणार असल्याची घोषणा शिंगे यानी केली.

राज्य महिला अध्यक्ष सौ. अर्चना चव्हाण यानी महिला पत्रकारानी स्वावलंबी होण्याच्या गरजेवर भर दिला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
नूतन महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ चित्रा शिंदे यांच्या हस्ते सौ.अर्चना चव्हाण याना सन्मानित करण्यात आले .सौ वैजयंता पाटील यांच्या हस्ते दैनिक महासत्ता चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.विष्णू पाटील यांच्या स्वागतपर गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला सौ वैष्णवी निलेश शिंदे यानी आभार मानले.अनिल कोकितकर यानी सूत्रसंचालन केले.यावेळी विनायक शिंदे, आकाश चव्हाण, सागर पोवार यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *