
वाढत्या महागाईमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे.व त्यामुळे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सर्व शेतकरी प्रयत्न करत आहेत,रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरापासुन निर्माण होणारे अन्नधान्य हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहेत व शेतीचेही आरोग्य धोक्यात येत आहे . नवनवीन रोगराई वाढत असताना विषमुक्त शेती किंवा पारंपरिक शेती आरोग्यासाठी हितकारक ठरणारी आहे .
नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन रासायनिक खतांचा वापर न करता सुध्दा शेती पिकवली जाते व ती आरोग्याच्या दृष्टीने व जमिनीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे . या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या गावचे श्री . नेमगोंडा पाटील(घुमगोंडा) यांनी सेंद्रीय शेतीचा पर्याय निवडून या माध्यमातून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला .
पहीली काही वर्ष शेतीचे उत्पन्न कमी होते पण नंतर त्यांनी देशी गाई गाईचे शेण, गोमूत्र यांचे योग्य नियोजन करून ते व त्यांचे कुटुंबीय काटेखोरपणे काम करताना दिसून येत आहेत, व त्यात त्यांचे सुपुत्र स्नेहलकुमार हे सिव्हिल इंजिनियर असुन सुध्दा त्यांना मदत करण्याकडे लक्ष देत आहेत . जुनी व नवीन तरुण पिढी हातात हात घालून काम करत असताना दोन्हीचा ताळमेळ घालन अवघड होते पण तो त्यांनी घातला व आपण पिकवलेल्या उत्पादन मालाला अापणच विक्रीचे मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी गांधीनगर मधील गणेश टाकी शेजारी सेंद्रीय ऊसाची रसवंती ,गुळ ,काकवी व भाजीपाला यांचे Go the farm नावाने शॉपी सुरु केली आहे,अशा प्रकारे प्रयत्न करणारे आमच्या गावातील ते पहीले शेतकरी आहेत .
त्यांच्या मुलग्याने नोकरी हा पर्याय न निवडता शेती व शेतीपुरक व्यवसायाकडे दिलेले लक्ष कौतुकास्पद आहे . दादांनी वळीवडे , चिंचवाड व पंचक्रोशीतील शेतकरी मित्रांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केले आहे व त्यांच्या निर्मित मालास विक्रीचे मार्केट सुध्दा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी माझ्या व माझ्या नाईक सरकार परिवार चिंचवाड यांचेकडुन सदिच्छा ….!!!
