कोल्हापूर (समीर काझी) :
कोल्हापूर शहरातील “पंचगंगा तालीम परिसरातील” लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते “रियाजभाई बागवान” यांची शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या “कोल्हापूर व सांगली जिल्हा समन्वयक (संपर्क प्रमुख)” पदी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ना. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते व शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपप्रमुख मा. मेहबूब सत्तार शेख यांच्या अध्यक्षतेखाली “रियाजभाई बागवान” यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या विशेष सत्कारप्रसंगी “रियाजभाई बागवान” यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आजवर केलेल्या विविध सामाजिक कार्यांचा गौरव विविध मान्यवरांनी केला. या सत्कारास उत्तर देताना “मा. रियाजभाई बागवान” यांनी आगामी काळात शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या माध्यमातून सर्व घटकांसाठी व विशेषतः अल्पसंख्याक सामाजासाठी भरीव कामगिरी करणार असल्याचे प्रतिपादन केले.
या सत्कार सोहळ्यास शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर सविता मोरे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संजय गांधी निराधार योजनेचे शहर अध्यक्ष किशोर घाटगे, शिव अल्पसंख्याक सेनेचे हसन शेख, रईस पटवेगार, विवेकसिंग रजपूत, इम्तियाज शेख, शिवसेना विभागप्रमुख सनी अतिग्रे, सुरेश कदम, राकेश पोवार, अनंत पाटील, आदी पदाधिकारी, विविध मान्यवर व असंख्य नागरिक उपस्थित होते.