विशेष प्रतिनिधी : अजय शिंगे
करवीर पोलीस उपाधीक्षकपदाचा कारभार आर. आर. पाटील(तात्या) तथा राजाराम पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्वीकारला
आर. आर. पाटील हे धडाडीचे पोलीस खात्यातील अधिकारी आहेत.त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे वाहतूक निरीक्षक कक्षाला पोलीस निरीक्षक या पदावरती उत्कृष्ट असे काम केलेलआहे. तत्वता त्यानंतर शाहूवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून,त्यांनी काही वर्षे काम केले आहे.सामाजिक स्तरावर ती शांतता राखणे जातीय सलोखा राखणे,गुन्ह्यांची उकल होण्याकरता गुन्ह्याच्या तपासासाठी,आपली प्रशासकीय कारकिर्दीतील संपूर्ण ताकद पणाला लावणारे आर. आर.पाटील (तात्या) हे, आपल्या वरचे जोखमीचे काम अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे काम करताना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळखतात. सर्वसामान्य गरीब कष्टकरी कुटुंबातील अनेकांच्या बरोबर, तात्या यांची खूप जिव्हाळ्याचे व चांगले संबंध आहेत.सतत वाचन करणे,लेखन करणे,यासह अध्यात्मिक ओढा असणारे तात्या हे संवेदनशील मनाचे अधिकारी आहेत.भारत सरकारचे वतीने त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानाने गौरविले आहे.तसेच तब्बल ६५० च्या वरती राज्य स्तरावरून विविध शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्था यांचेकडून श्री. तात्या यांना रिवॉर्ड मिळालेले आहेत. तात्या यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी यांच्या कार्यालयात गर्दी केली होती.