स्वतंत्र्यसेनानी, देशाचे उपपंतप्रधान आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते स्व. यशवंतराव चव्हाण यांची १२ मार्चला जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानं स्वं. चव्हाण यांच्या कार्याची नव्या पिढीस प्रेरणा मिळावी यासाठी ११ मार्च रोजी दुपारी १ वाजता शाहू स्मारक भवन या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेत. या स्पर्धेसाठी स्वं. यशवंतराव चव्हाण याचं साहित्यातील योगदान, मला भावलेले चव्हाण साहेब, महाराष्ट्रातील जडणघडीतील चव्हाण साहेबांचे योगदान, मला आवडलेले पुस्तक सह्याद्रीचे वारे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि चव्हाण साहेबांचे योगदान, भारताच्या जडणघडणीतील चव्हाण साहेबांचे योगदान, देवराष्ट्रे त दिल्ली चव्हाण साहेबांचा प्रवास, महाराष्ट्राची सहकारी चवळवळ आणि चव्हाण साहेबांचे योगदान, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते चव्हाण साहेब असे नऊ विषय स्पर्धेसाठी देण्यात आले. या स्पर्धा तीन गटात होणार असून ५ वी ते ७ इयत्तेतील महापालिका आणि जिल्हापरिषद शाळा गटातून प्रत्येकी १२ आणि कराड तालुक्यातील निमंत्रित १६ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झालेत. तीन गटातून पहिल्या चार क्रमांकांन ५००१, ३००१, २००१ आणि उत्तेजनार्थ १००१ अशी रोख बक्षिस दिली जाणार असून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डाॉ. डी. टी. शिर्के, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बक्षिस वितरणाचा कार्यक़्रम होणार आहे. तर सायंकाळी ४.३० वाजता शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील याचं यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि आजचे दिशाहिन राजकारण या विषयावर व्याख्यानं होणार आहे. या वक्तृत्व स्पर्धेचं फेस बुक पेज लाईव्ह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोल्हापूर यावरुण ऑनलाईन थेट प्रक्षपण केलं जाणार आहे. पत्रकार बैठकीला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजसिंह पाटील, अशोक पोवर,रमेश मोरे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान आयोजन

Read Time:3 Minute, 16 Second