भाजपाच्यावतीने तीव्र निषेध दोन्ही विषयात न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने जनतेच्या व MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यां सोबत राहणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. या पद्धतीच्या घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट येऊन काल संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रतिसाद उमटले. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे सुरु वीज बिल कनेक्शनची सुरु असलेली तोडणी याच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे रास्ता रोको करून तीव्र निदर्शने करण्यात आली.
स्पर्धा परीक्षेची तारीख पुढे ढकलली असे समजताच विद्यार्थांमध्ये रोश पहायला मिळाला. या परीक्षेस संपूर्ण महाराष्ट्रातून साधारण ६ लाख विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्याच्या मार्गावर असताना ऐन वेळेस ही परीक्षा सहाव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे गेल्यानंतर सर्व विद्यार्थी नाउमेद झाले आहेत. काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपण्याची अडचणही विद्यार्थ्यांसमोर आहे.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाबाबत आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन यावेळी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. MPSC परिक्षांर्थी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणा-या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, वीज कनेक्शत तोडण्यास येणाऱ्या निर्लज्ज महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयशून्य कारभारामुळे चाललाय आमच्या भविष्याचा नुसता खेळ ! ताळमेळ बसेना परीक्षाचा घोळ सुटेना ! महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा आणि निषेधाचे फलक दाखवण्यात आले.
त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात संबंधित मंत्री महोदयांनी विज बिल माफी व वीज कनेक्शन तोडणार नाही असे निवेदन केले होते. पण अधिवेशन संपताच विज तोडणीसाठी महावितरण कंपनीला लगेच वीज तोडणीच्या सूचना दिल्या ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे अशा या दोन्ही घटनांनी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची, एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची घोर फसवणूक व त्यांच्यावर अन्याय केला आहे तो दूर होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्त बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील निर्णयशून्य महाविकास आघाडी विरोधात सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देऊन जनतेला यातून बाहेर काढेल.
.यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, विजय आगरवाल, राजू मोरे, सचिन तोडकर, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष संतोष माळी, आशिष कपडेकर, मामा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते