Share Now
Read Time:1 Minute, 5 Second
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा लागली असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाला आहे. १८ टेबलांवर ३६३९ मते मोजली जाणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीला १० वाजता प्रारंभ होईल. त्यानंतर काही तासांत हा निकाल लागण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश दिला जात आहे. गृहमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात जोरदार चुरस असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने याची उत्कंठा लागली आहे. रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये ही मतमोजणी सुरू असून येथे कडक पोलिस बंदोबसत तैनात केला आहे.
Share Now