लसीकरण केंद्रावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गारगोटी पोलीसांनी केला एकावर गुन्हा दाखल.

विशेष वृत्त : जावेद देवडी

दि. १२ ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे लसीकरण सुरू असताना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीने घातला धिंगाणा.

Advertisements

५:०० वा . सुमारास बाळू उर्फ सर्जेराव पंढरीनाथ चौत्रे रा. गारगोटी हा ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे लसीकरण सुरू असलेल्या ठिकाणी गेला व लसीकरण कामाचे व्हिडिओ शूटिंग करून लसीकरण करणाऱ्या लोकांचे रजिस्टर चेक करू लागला.
तसेच लसीकरण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुढाऱ्यांच्या नातेवाईकांचे लसीकरण बंद करा, वशिलेबाजी बंद करा असे मोठ्याने बोलून शिवीगाळ करू लागला. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून लसीकरण विभागातील स्टाफला धक्काबुक्की केली तसेच दत्तात्रेय मिरजकर यांना धक्काबुक्की करून लसीकरण करणाऱ्या
नर्स प्रदिप्ता दत्तात्रय सुतार यांना दमदाटी करून अंगावर धावून जाऊन लसीकरणाचे काम बंद पाडून शासकीय कामात अडथळा आणले बाबत प्रदिप्ता दत्तात्रय सुतार, नर्स ग्रामीण रुग्णालय गारगोटी यांनी दिलेले तक्रारीवरून आरोपी बाळू उर्फ सर्जेराव पंढरीनाथ चौत्रे,रा.गारगोटी याचे विरोधात गुरंन १२६/२०२१ भादवि कलम ३५३,५०४,५०६ ,व १२०,११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बाळू उर्फ सर्जेराव पंढरीनाथ चौत्रे यास ताब्यात घेण्यात आले आहे असुन. पुढील कार्यवाही भुदरगड पोलिस ठाणे
पोलीस निरीक्षक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *