विशेष वृत्त: राजू पाटील
चौवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना
धुनी भांडी करणार्यां होतकरू लता शिंदे यांनी सायकलवरून समोसा व पाणी वाटप करून जपल्या सामाजिक बांधिलकी
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा गेल्या वर्षी २०२० पासुन संक्रमणाचा सर्वत्र मोठा संकट उभे आहे, केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने covid 19 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सारख्या अनेक मोठ्या निर्णय घेण्यात आले अशातच अनेक कुटुंबांचे हाल होऊन मोठे नुकसान झाले,अशा कठीण काळात एकमेकांना कसे मदत करता येईल. या उद्देशाने डॉक्टर , आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी
युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत, अशातच गरिब कुटूंबातील खऱ्या अर्थाने मातृदिनाचे परीचीती देत सामाजिक बांधिलकी जपत दुसऱ्यांच्या घरांमध्ये भांडी दुनी काम करणाऱ्या माऊली लता शिंदे.राहणार विद्यानगर वारणाली सांगली शहरात राहणारी महीला भर दुपारी उन्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांना सायकलवरून आपल्या कष्टाच्या पैसातुन समोसा व पाणी वाटप करीत आहे पोलिसांच्या कामगिरीबद्दल आपुलकीने कौतुक करीत मुलांनो दोन घास खाऊन घ्या आपली ही काळजी घ्या अशा संदेश देत संपुर्ण सांगली शहरात फिरत आहे.
या लता शिंदे मावशीच्या कार्याची दखल घेत सर्वत्र कौतुक होत आहे.